अकोला जिल्हा प्रतिनिधि:- गणेश वाडेकर
अकोला जिल्ह्यासह सात जिल्ह्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आणि फरार असलेल्या सराईत आरोपीं पैकी एकाला पकडण्याची कामगिरी शेगाव पोलिसांनी पार पाडली आहे. गणेश बांगरे हा मूळचा वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी व सध्या अकोला येथील खडकी भागात वास्तव्यास होता.
एका अल्पवयीन मुलीला फसवून पळवून नेल्याप्रकरणी दिग्रस पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता.
शेगाव येथील मंदिरसंस्थेच्या आवारात खात्रीलायक बातमीदाराकडून माहिती मिळाल्यावरून शेगाव पोलिसांनी तात्काळ पावले उचलत बांगरे याला मुलीसह ताब्यात घेतले.
