प्रदीप चौधरी नागपूर 8668466438
आज आमचे मार्गदर्शक, थोर विचारवंत, पर्यावरणप्रेमी आणि आमच्या बालपणीच्या आठवणींच्या केंद्रस्थानी असलेले अरविंद भाऊ यांचा वाढदिवस! भाऊंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक, प्रेमळ आणि कोटी कोटी शुभेच्छा!
लहानपणापासून आम्ही सारे बालमित्र भाऊंच्या स्नेहाच्या आणि मार्गदर्शनाच्या सावलीत वाढलो. माझा बालमित्र राजेंद्र सरदार यांचे ते मोठे बंधू असले तरी आम्हा सर्वांच्याच आयुष्यात ते एक आदर्श मोठे भाऊ बनले. रोहणीला अगदी शेजारी राहत असल्यामुळे आम्ही मुलं आमच्या घरापेक्षा भाऊंच्याच घरी अधिक वेळ घालवत असू.
भाऊ शिक्षणासाठी वर्धेला गेले आणि आमचा शालेय प्रवास रोहणीत सुरू होता. नंतर जेव्हा आम्ही – मी, राजू, सुरेश, अशोक आणि उमेश – सातवी नंतर आठवीसाठी वर्धेला आलो, तेव्हा पुन्हा तीच जवळीक, तेच आपुलकीचे क्षण अनुभवायला मिळाले.
त्याकाळी भाऊ व राजू सुदामपुरीत राहत असत, तर मी आजीसोबत गोंड प्लॉटमध्ये राहत होतो. अंतर असूनही, मनाची ओढ आम्हाला एकमेकांकडे नेई. राजुकडे गेले की भाऊंची भेट व्हायची. त्या भेटींमध्ये फक्त गप्पा नाही, तर जीवनाच्या विचारांची शिदोरी मिळायची – सत्य, सेवा, आदर्श जीवनशैली या मूल्यांचं बीजारोपण तेव्हाच झालं. आजही ती शिकवण सोबत आहे.
अरविंद भाऊंची अजून एक खासियत म्हणजे सर्वांवर प्रेम – कुणावरही भेदभाव नाही, मदतीचा हात सदैव पुढे. पर्यावरणाच्या कामात ते आजही वर्धेला मोठं कार्य करत आहेत. हसतमुख, शांत स्वभाव आणि प्रेमळ संवाद यामुळे ते सर्वांचे लाडके आहेत.
माझ्या परिवारावर त्यांचं विशेष प्रेम आहे – माझे आईबाबा आणि भाऊ रवीलाही ते नेहमी भेटायला यायचे, विचारपूस करायचे. तीन वर्षांपूर्वी लोणावळ्याच्या ट्रिपमध्ये आम्ही एकत्र होतो. वाहिनींचीही साथ होती. Imagica मधल्या त्या ट्रिपचे क्षण अजूनही स्मरणात आहेत – मस्त मजा, हास्य, आणि एकत्रित वेळ.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही सगळी आठवण एकत्र करत आहे – एक सुंदर प्रवास, एक नातं आणि एक संस्कारांचा वारसा.
अरविंद भाऊ – तुमचं आयुष्य सदैव आरोग्यपूर्ण, आनंदी, आणि प्रेरणादायी असो. तुम्ही आमच्यासाठी नेहमीच प्रकाशाचा दीप राहाल.
