पियूष गोंगले माहिती संकलन विभाग प्रमुख
अहेरी : तरुण वयात मौजेसाठी प्राशन केलेले मद्य, कालांतराने व्यसन होते. व्यक्तीने व्यसनावर नियंत्रण न ठेवल्यास कुटुंबावरच संकट कोसळते. मद्याच्या या व्यसनाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहे. या जीवघेण्या, विळख्यात सापडलेल्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी ‘अल्कोहोलिक अॅनॉनिमस’ ही संस्था संकटमोचकाचे कार्य करीत आहे. या आंतरराष्ट्रीय संस्थेची शाखा आलापल्ली येथे आहे.अल्कोहोलिक अनानिमस ची गुड मॉर्निंग समूह आलापल्ली या नावाने आठ वर्षांपूर्वी शाखा स्थापन करण्यात आली होती. या शाखेच्या माध्यमातून 30 च्या वर मद्यपिडीत मद्यापासून दूर आहेत. नवागतांना सोबत घेऊन या सर्व बांधवांनी एकत्रित येऊन गुड मॉर्निंग समूह आलापल्ली चा आठवा वर्धापन दिन सोहळा थाटात साजरा केला.आयोजित या अनोख्या सोहळ्याला अल्कोहोलिकचे अनानिमस चंद्रपूर येथील बांधव सहभागी झाले होते. अहेरी, आलापल्ली व चंद्रपूरच्या बांधवांनी मध्यबाबतचे आपले मत व्यक्त केले.अतिमद्य सेवन हा एक आजार आहे. अशा आजारातून व्यक्तीला बरा करण्यासाठी कुणा औषधाची नव्हे तर मानसिकता बदलण्याची गरज असते. याच विचारातून अमेरिकेतील दोन पूर्वाश्रमीचे मद्यपी बॉब स्मीथ आणि बिल विल्सन यांनी ‘अल्कोहोलिक अनॉनिमस’ ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली. आज या संस्थेच्या जगातील १७५ देशात शाखा आहेत. भारतातही ही संस्था कार्य करीत असून आलापल्ली, अहेरी येथे संस्थेचे अनेक प्रतिनिधी निस्वार्थपणे सेवा देतात. ही संस्था सरकारकडून कोणतेही अनुदान स्वीकारत नाही किंवा दानदात्यांकडून देणगी घेत नाही.
संस्थेशी जुळलेल्या सदस्यांच्या अर्थसहाय्यातून संस्थेचे काम चालत असते. रविवार, मंगळवार, बुधवार, सोमवार, शुक्रवार या दिवशी होणाऱ्या नियमित सभांमध्ये मध्य पीडित बांधवांनी सहभागी होऊन संस्थेच्या मोफत उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळेस संस्थेच्या सभासदांनी केले.आलापल्ली येथील विनोद नामक बांधवांचा मद्य मुक्तीचा पहिला वाढदिवस या वेळेस साजरा करण्यात आला. विनोद यांनी अनुभव कथन करताना सांगितले की, स्वतःच्या स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवले तर दारूपासून दूर राहता येते असे अनेकांचे मत आहे. मी पण हा प्रयोग केला होता. यात मला वारंवार अपयश आले.
अल्कोहोलिक ऍनानीमसच्या नियमित सभांना गेल्यानंतर मला मदतीची गरज आहे आणि मदतीतूनच मी दारूपासून दूर राहू शकतो हे मला पटले. जुन्या सभासदांचे मार्गदर्शन, सहकार्य यातून मला मद्य मुक्तीचा एक वर्षाचा पल्ला गाठता आला. मद्य पीडितांविषयी आत्मीयता ठेवणारी ही जगातली एकमेव संघटना असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळेस सुभाष, राजू, दिलीप, सतीश व इतरांनी आपले मद्य विषयी अनुभव कथन केले. वर्धापन दिन सोहळ्याचे संचालन नंदकिशोर यांनी केले.
अल्कोहोलिक ऍनानीमसच्या प्रार्थनेने सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळेस मोठ्या संख्येने अल्कोहोलिक अनानिमसचे सभासद उपस्थित होते.
