लोहा प्रतिनिधी (शुभम उत्तरवार)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी ने लोहा तालुक्यातील जुन्या पदाधिकाऱ्यांना हटवून नुतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या असुन यात भाजपा च्या लोहा शहर मंडळ अध्यक्ष पदी लोहा न.पा.चे मा. नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांची निवड केली तर भाजपा लोहा मंडळ दक्षिण अध्यक्ष पदी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन सुरनर व भाजपाच्या मंडळ उतर अध्यक्ष पदी माजी. उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांची निवड करण्यात आली.
दि . २० एप्रिल २०२५ रोजी लोहा येथील भारतीय जनता पार्टी चे पक्ष निरीक्षक माणिकराव लोहगावे यांच्या अध्यक्षतेखाली लोहा तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून झालेला विविध विकास कामे भारतीय जनता पार्टी चे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा पक्ष अधिकाधिक मजबूत करण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहा तालुक्यातील भाजपा पक्षाची पुनर्बाधणी करण्यासाठी लोहा तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नुतन निवडी पुढीलप्रमाणे करुन त्यांच्यावर पक्ष जबाबदारी सोपविण्यात आली.
यात भारतीय जनता पार्टी च्या लोहा शहर मंडळ अध्यक्षपदी मा. नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली तर लोहा दक्षीण मंडळ अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन सुरनर व लोहा. उतर मंडळ अध्यक्ष पदी माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांची निवड करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टी चे पक्ष निरीक्षक माणिकराव लोहगावे, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते नागनाथ चुडावकर,मा.नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष शरद पवार, माजी पं.स. सदस्य डॉ. सुनील धोंडगे, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केरबा केंद्रे, मा.नगरसेवक अमोल व्यव्हारे मा.नगरसेवक संदीप दामकोंडवार मा. नगरसेवक युवराज वाघमारे लक्ष्मण फुलवरे बाळासाहेब कतुरे बबनराव नावंदे विजय केंद्रे, बबन हुलसुरे,डी.एन. कांबळे, पिनू चुडावकर, सुधाकर सातपुते,, ताटे पाटील, यांच्या सह मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते.
