दहेगाव स्टेशन (ता. वर्धा) | प्रतिनिधी:- युसूफ पठाण
‘Generation Working Together’ संस्थेच्या पुढाकाराने साजऱ्या होणाऱ्या जागतिक आंतरपिढी सप्ताह निमित्ताने महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सहजीवन प्रकल्पा अंतर्गत दहेगाव स्टेशन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या वेळी ज्येष्ठ नागरिकांनी संगीत संध्याचे आयोजन केले, ज्यात लहान मुलांनी आजी-आजोबांकडून शिकलेले भजन सादर करत वाद्ये वाजवून उपस्थितांची मने जिंकली.
नंतर आजी-आजोबा व नातवंडांच्या जोड्यांमध्ये निंबू चमचा रेस, ब्रस्ट बलून, ग्लास टॉवर, ब्लाइंड बॉल पासिंग या मजेशीर स्पर्धा घेण्यात आल्या. शेवटी सामूहिक खेळाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्षेत्र समन्वयक जितेंद्र शहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आशा वर्कर जयमाला सरदार, प्रभाकर घाडगे व इतर सहजीवन गट सदस्य व गावकरी यांनी पुढाकार घेतला.
या वेळी दामोदर राऊत आधारवड, अर्चना मुन गतप्रवर्तक, डॉ. राहुल पेठे सहजीवन प्रकल्प समन्वयक व योगेश ढोक क्षेत्र समन्वयक आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे गावात पिढ्यांतील संवाद वाढवण्यास मदत झाली असून नवीन पिढी व जुनी पिढी यांना संधी उपलब्ध करून सहजीवन प्रकल्प हा समाजाला एकत्र आणणारा उपक्रम ठरत आहे.
