हातकणंगले प्रतिनिधी, सचिन लोंढे
हातकणंगले ) येथील श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था इचलकरंजी यांच्यावतीने कुंभोज गावचे सुपुत्र व पत्रकार विनोद शिंगे यांना आदर्श समाज रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्यांच्या या पुरस्काराबद्दल कुंभोज ग्रामपंचायत तसेच हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अशोक रावजी माने, माजी आमदार डॉक्टर सुजित मिंणचेकर जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव तसेच ग्रामपंचायत यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
श्रमशक्ती एकता सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त व्याख्यान स्मरणिका प्रकाशन व श्रमशक्ती राष्ट्रीय व राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न मोती अवॉर्ड 2025 वितरण सोहळा हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने(बापू ) यांच्या हस्ते संपन्न झाला .
यावेळी सरपंच संतोष भोरे, स्विय सहायक सुहास राजमाने,गुरुवर्य गौरीताई, किसनराव कुराडे सर, अभिनेत्री मराठी चित्रपट माला संकेश्वरकर, अभिनेत्री मराठी चित्रपट छाया सांगावकर, अभिनेत्री मराठी चित्रपट कादंबरी माळी, अभिनेत्री मराठी चित्रपट योगेश पवार, अभिनेत्री मराठी चित्रपट प्रणोती कुमठेकर, अश्विनी कुबडगे, संस्थापक अध्यक्ष अमित काकडे, पत्रकार अतुल मंडपे, पत्रकार विनोद शिंगे, शिल्पा बहेनजी, गायिका अस्मिता माळगे, मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी न्यूज ट्वेंटी फोर चे प्रतिनिधी विनोद शिंगे यांना राष्ट्रीय समाज रत्न आदर्श पत्रकर्ता पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
