पियुष गोंगले: – माहिती संकलन विभाग प्रमुख
ध्वनी चित्र रंजन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि. ३ मे रोजी वर्धा येथे करण्यात आले.
सांस्कृतिक कार्य विभाग हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन वहन व संवर्धनाचे कार्य करत असतात. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.यंदा ०१ ते ०४ मे २०२५ दरम्यान वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समीटचे आयोजन जिओ कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे, मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समीटच्या अनुषंगाने ध्वनी चित्र रंजन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच भाग म्हणून वर्धा जिल्ह्यातही या विशेष कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि.3 मे रोजी वंजारी चौक येथील पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर, स्मारक व सभागृह येथे पार पडला.
संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा,”मनोरंजन आणि जाहिरात क्षेत्रातील स्थान, नृत्य सादरीकरण, महाराष्ट्र गीतांची मेलडी, स्थानिक लोककला नृत्य सादरीकरण, स्थानिक वाद्य जुगलबंदी, नाट्यगीत,चित्रपट गीत, लोकनृत्य,लोकगीत, लोकधारा असे विविध कार्यक्रमाची सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे स्थानी, मा.श्री. संजय इंगळे तीगावकर (विशेष कार्यकारी अधिकारी सावंगी मेघे), मा. श्री. समीर पेंडके(सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती, वर्धा), मा.श्री. नरेश उगेमुगे (वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ, वर्धा), मा.श्री.दिलीप रोकडे (ज्येष्ठ संगीतकार,वर्धा) लोकगीतांचा कार्यक्रमात, गायिका मा.सौ. खुशबू काठाने मॅडम, मा.श्री. श्याम सरोदे सर,मा.श्री.नितीन वाघ सर, मा.श्री.अजय गलांडे सर आणि सुंदर नृत्य आविष्कार sam art academy तर्फे सादर करण्यात आले, या सर्व स्थानिक कलाकारांच्या सहयोगाने पार पडलेला सुंदर लोककलेचा जागर हा कार्यक्रम श्री.प्रतीक सूर्यवंशी नाट्यप्रातिक थिएटर अकॅडमी यांच्या सहयोगाने पार पडला.
या कार्यक्रमाची संकल्पना ॲड आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य तसेच माहिती व तंत्रज्ञान मंत्री यांची असून या कार्यक्रमास श्री विकास खारगे मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांची मार्गदर्शन लाभले आहे या कार्यक्रमाचे नियोजन श्री विभीषण चवरे संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.
